Khed | युवानेते निलेश येवले यांच्याकडून सात गावात ७ हजार कुटुंबांना 2025 दिनदर्शिकेचे वाटप

युवानेते निलेश येवले जि.प. किंवा पं.स. निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणात एंट्री करणार

Khed | युवानेते निलेश येवले यांच्याकडून सात गावात ७ हजार कुटुंबांना 2025 दिनदर्शिकेचे वाटप
Khed | युवानेते निलेश येवले यांच्याकडून सात गावात ७ हजार कुटुंबांना 2025 दिनदर्शिकेचे वाटप

MLA dilip mohite patil | Nilesh yewale 

 

महावार्ता लाईव्ह | पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत कान्हेवाडी तर्फे चाकण येथील युवानेते व लोकसेवा जन फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश येवले यांनी सांगुर्डी, येलवाडी, खालुंब्रे, खराबवाडी, महाळूंगे, निघोजे व कान्हेवाडी तर्फे चाकण गावच्या परिसरातील नागरिकांना सन २०२५ या वर्षीच्या दिनदर्शिकाचे मोफत वाटप करण्यात आले. या दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी आमदार व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक दिलीप मोहिते पाटील यांचे हस्ते राजगुरूनगर येथे झाले.

 

येवले हे फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक व धार्मिक असे अनेक उपक्रम राबवितात.यावर्षी त्यांनी कान्हेवाडी तर्फे चाकण, सांगुर्डी, येलवाडी, खालुंब्रे, खराबवाडी, महाळूंगे, निघोजे या गावच्या परिसरातील सर्व नागरिकांना दिनदर्शिका मोफत वाटप केली. वर्षभरातील प्रत्येक दिवसाची परिपूर्ण माहिती असलेली दिनदर्शिका जवळपास सात हजार नागरिकांना वाटप केली. परिपूर्ण माहितीची दिनदर्शिका मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करीत येवले यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

 

युवानेते निलेश येवले यांनी आतापर्यंत गणेशोत्सव मंडळ आणि लोकसेवा जन फाऊंडेशन यांच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी अनेक विविध उपक्रम राबविले.यामध्ये विशेषत: जागर स्त्री शक्तीचा,खेळ रंगला पैठणीचा यासह पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी दरवर्षी अन्नदान, फळ वाटप तसेच वृक्ष लागवड, समाजप्रबोधनपर व्याख्यानं, मंदिर जीर्णोद्धार, कोरोना काळात अन्नदान किट वाटप यांसारख्या विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येवले अग्रेसर आहेत.

 

दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोत्रे निलेश थिगळे, बाजार समितीचे संचालक हनुमंत कड,रणजित गाडे, पप्पूदादा टोपे, मनोज खांडेभराड, कैलास गायकवाड तसेच कान्हेवाडी, सांगूर्डी,येलवाडी या गावचे युवक उपस्थित होते.

 


समाजात पुढे येऊन काम करणाऱ्या लोकांची समाजाला गरज आहे. समाजहीत जोपासणाऱ्या निलेश येवले सारख्या युवकाच्या पाठीमागे सर्वांनी उभे राहिले पाहिजे. भविष्यात राजकारणात ज्या ज्या संधी उपलब्ध होतील त्या संधी आपण होतकरू व उज्ज्वल भविष्य असणाऱ्या निलेशला दिल्या जातील.
दिलीप मोहिते पाटील - मा.आमदार खेड तालुका 


गावात अनेक उपक्रम राबविल्याने कान्हेवाडी तर्फे चाकण ग्रामपंचायतीने तालुका, जिल्हा, महाराष्ट्र शासन व केंद्र शासन पुरस्कृत असलेले अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. एकीच्या जोरावर गाव विकास प्रक्रियेने पुढे गेले असून अनेक योजना राबविल्या जात आहेत. गावासह परिसरातील गावचे नागरिक यांच्या पाठबळावर राजकारणात येऊन लोकोपयोगी उपक्रम आणि विकास साधला जाईल.
निलेश येवले - अध्यक्ष, लोकसेवा जन फाउंडेशन