Khed | राक्षेवाडी ग्रामपंचायतकडून दिव्यांगांना धनादेश वाटप
धनादेश हातात मिळताच दिव्यांगांकडून आनंद व्यक्त | दरवर्षी न चुकता ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व प्रशासन दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील राक्षेवाडी ग्रामपंचायतीने राखीव पाच टक्के अपंग कल्याण निधीतून गावातील दिव्यांगांना धनादेशाचे वाटप केले.धनादेश हातात मिळताच दिव्यांगांनी आनंद व्यक्त करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलल्याचे पाहायला मिळाले.
राक्षेवाडी ग्रामपंचायत दरवर्षी गावच्या हद्दीत राहणाऱ्या आणि अपंगाचे प्रमाणपत्र असलेल्या दिव्यांगांना ग्रामपंचायत उत्पन्नाच्या पाच टक्के अपंग राखीव निधीतून धनादेश वाटप करीत आहे. यावर्षी २३ दिव्यांगांना प्रत्येकी ५ हजार एकशे अडूसूष्ठ रुपयेचा धनादेश वाटप करण्यात आला.
दरवर्षी न चुकता ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व प्रशासन दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत करीत आहे.धनादेश मिळाल्याने उपस्थित दिव्यांगानी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.दिव्यांग व्यक्तींनी स्वतःसाठी पैसे खर्च करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच व सदस्यांनी यावेळी केले.
धनादेश वाटप प्रसंगी बाजार समितीचे संचालक व ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य अशोकदादा राक्षे, सरपंच सविता राक्षे, उपसरपंच रविराज राक्षे, ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच सुरेखा राक्षे, मच्छिन्द्र राक्षे, जितेंद्र सांडभोर, श्रद्धा सांडभोर, वैजयंता थिटे, चांगुणा थिटे, ग्रामसेवक सारिका कडूसकर, पोलीसपाटील पप्पूकाका राक्षे, माजी उपसरपंच बाबुराव राक्षे व जिप शाळेचे शिक्षक उपस्थित होते.
ग्रामपंचायत उत्पन्नाच्या स्वनिधीतून पूर्वी ३ टक्के आणि आता ५ टक्के अपंग निधी राखीव आहे.अपंग राखीव निधीतून गावातील सर्व अपंग व्यक्तींना ग्रामपंचायत दरवर्षी धनादेशद्वारे ५ टक्के निधी वाटप केला जातो.धनादेश मिळाल्यानंतर अपंग व्यक्ती आवश्यकतेनुसार खर्च करतात.गावातील अपंग व्यक्तींना बोलवून धनादेश वाटप करणारी तालुक्यातील ग्रामपंचायत म्हणजे राक्षेवाडी आहे.अपंगांना आलेल्या अडचणी देखील ग्रामपंचायत स्तरावर सोडवून त्यांना न्याय दिला जात आहे.असे ग्रामपंचायतीचे
विद्यमान सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांनी यावेळी सांगितले.