Khed | चांडोली ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. प्रिया नवनाथ पवळे

ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन गावचा कारभार करणार : पवळे

Khed | चांडोली ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. प्रिया नवनाथ पवळे

 

राजगुरूनगर : आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या चांडोली (ता.खेड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.प्रिया नवनाथ पवळे यांची बिनविरोध निवड झाली.सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाल्याने ग्रामस्थांनी गुलाल भंडाराची मुक्तपणे उधळण करीत आनंद व्यक्त केला.

 

विद्यमान सरपंच सुनीता चेतन सावंत यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाची मुदत संपताच सरपंचपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त असलेल्या सरपंचपदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा कडूसच्या विभाग मंडलाधिकारी सविता विटे यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.४) रोजी घेण्यात आली.निर्धारित वेळेत सरपंच पदासाठी प्रिया पवळे यांचाच एकमेव अर्ज आला.अन्य कुणाचेही अर्ज न आल्याने पवळे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा विटे यांनी सभागृहात सदस्यांच्या उपस्थितीत केली.सरपंचपदाची निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.ग्रामपंचायतीत चिकाशेठ वाघमारे यांचे ग्रुपचे बहुमत असल्याने त्या सर्व सदस्यांना सरपंच, उपसरपंच पदाची संधी मिळत आहे.

 

 

निवडणूक प्रसंगी सभागृहात मावळत्या सरपंच सुनीता चेतन सावंत,विद्यमान उपसरपंच सतीश मोहन सावंत,माजी उपसरपंच चिकाशेठ वाघमारे,माजी सरपंच सुनीता नवनाथ सावंत, रुपेश बाळासाहेब ताये, आरती किशोर डोळस आदी उपस्थित होते.निवडणूकीचे प्रशासकीय कामकाज ग्रामसेवक प्रताप गुरव यांनी पाहिले.निवडीनंतर ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सरपंच प्रिया पवळे यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

 

 

 

ग्रामपंचायत सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन गावात विकासकामे केली जातील. गाव विकास प्रक्रियेने पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच पवळे यांनी निवडीप्रसंगी बोलताना सांगितले.