हुसेनिवाला बॉर्डर फिरोजपूर पंजाब येथे शहीदांना अभिवादन 

हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव या क्रांतिवीरांना " भारतरत्न " देण्याची मागणी विठ्ठल पाचारणे यांनी केली.

हुसेनिवाला बॉर्डर फिरोजपूर पंजाब येथे शहीदांना अभिवादन 

अमितकुमार टाकळकर 


राजगुरुनगर : भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे देशाचे महान सुपुत्र,थोर क्रांतिवीर हुतात्मा राजगुरू,भगतसिंग, सुखदेव यांच्या ९४ व्या पुण्यतिथीच्या दिनाचे औचित्य साधून क्रांतिकारकांचे अभ्यासक आणि क्रांतिवीर राजगुरु ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल पाचारणे, कार्याध्यक्ष दादाभाऊ चौधरी, प्रमुख विश्वस्त अरुण सांडभोर , दत्तात्रय शिंदे, पांडूरंग सांडभोर, वैशाली चौधरी, सविता शिंदे , जयश्री सांडभोर, संगिता पाचारणे, सविता सांडभोर तसेच सहभागी महिला-पुरुषांनी शहीद राजगुरु , भगतसिंग व सुखदेव यांच्या समाधीस्थळी  पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.

यावेळी क्रांतीकारक भगतसिंग यांचे पुतणे किरणजितसिंग संधू, राणासिंग संधू , सुमन कटारिया , पुरण जसुजा इत्यादी उपस्थित होते. सत्येंद्रसिंग जानी, भाजपा माजी प्रदेशाउपाध्यक्ष व माजी कॅबिनेट मंत्री पंजाब, कॅबिनेट मंत्री लालजितसिंग भुल्लर, फिरोजपुरचे चारही आमदार, जिल्हाधिकारी समवेत यांनीही अभिवादन केले. 

विठ्ठल पाचारणे यांनी शहीद राजगुरु, भगतसिंग व सुखदेव या क्रांतिवीरांना भारतरत्न द्यावे अशी मागणी करताच सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. क्रांतिवीर राजगुरु ट्रस्टचे हे ९ वे वर्ष आहे.जे प्रत्यक्ष समाधीस्थळी जावून अभिवादन करतात.यावेळी भारतरत्न या सर्वोच्च सन्मानासाठी विठ्ठल पाचर्णे यांची मागणी तेथील सर्व मीडियाने उचलून धरली आणि तथाकथित संबंधितांनी काढता पाय घेतला. क्रांतिवीर राजगुरु भगतसिंग व सुखदेव यांना शहीद दर्जा मिळावा यासाठी आग्रह धरण्यात आला त्यासाठी विशेष मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे समाधीस्थळी करण्यात आली.