चाकण येथून कत्तलीसाठी गाईंची वाहतूक ; एकास अटक

चाकण येथून कत्तलीसाठी गाईंची वाहतूक ; एकास अटक

चाकण : न्यूज नेटवर्क

कत्तल्लीसाठी गाईंच्या वाहतूक प्रकरणी चाकण पोलिसांनी एकाला अटक करण्यात आली आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शनिवारी ( दि.१२ ) सकाळी नऊ सुमारास चाकण जवानवरांचा बाजार येथे हा प्रकार घडला.

मोहसीन कादर बैग (रा. जुन्नर) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर, शाबीर नन्नूपटेल कुरेशी (रा. जुन्नर) याच्या विरोधात प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बजरंग दल कार्यकर्ता योगीराज सुरेश करवंदे (वय 23, रा. राजगुरुनगर, पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी MH 04 FJ 7043 या पिक अप मध्ये पाच गाई दाटीवाटीने भरुन कत्तलीसाठी वाहतूक केली. यामध्ये तीन गाई व दोन कालवड होत्या. असे फिर्यादीत म्हटले आहे. एक आरोपीला अटक करण्यात आली असून, चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

---------------------------------------------------------------