Rajgurungar | धक्का लागल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्याला लोखंडी गजाने गंभीर मारहाण

चार विद्यार्थ्यांवर खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Rajgurungar | धक्का लागल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्याला लोखंडी गजाने गंभीर मारहाण

 

राजगुरुनगर : रस्त्याने चालत असताना एका विद्यार्थ्यांचा दुसऱ्या विद्यार्थ्याला धक्का लागल्याने तुला लय माज आला का,रस्त्याने नीट चालता येत नाही का असे म्हणत कॉलेजच्या एका विद्यार्थ्यांला लोखंडी गजाने गंभीर मारहाण केल्याची घटना राजगुरूनगर येथे गुरुवारी (दि.२६) रोजी घडली. याप्रकरणी चार अल्पवयिन विद्यार्थ्यांवर खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 


कु.आशिष ज्ञानेश्वर बच्चे, वय१७रा .देवोशी,ता.खेड,जि. पुणे असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.मारहाण झाल्याबाबत या विद्यार्थ्याने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादी नुसार ओंकार वाडेकर,साहिल मुळूक, आदित्य कळडोके,शुभम हुंडारे यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व आरोपी हे एकाच कॉलेजमध्ये बारावी मध्ये शिकत आहेत. कॉलेज मध्ये जाण्यासाठी वेळ असल्याने फिर्यादी जवळच्या सिद्धेश्वर मंदिराकडे जात होता तर आरोपी विरूद्ध दिशेने चालत येत असताना फिर्यादीचा धक्का समोरून येणाऱ्या आरोपी विद्यार्थ्याला लागला.याला लय माज आला का, नीट चालता येत नाही का असे म्हणून वरील चार आरोपी विद्यार्थ्यांनी एका फिर्यादीला शिवीगाळ करीत लाथा बुक्कयांनी तसेच लोखंडी रॉडने मारहाण केल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली.याबाबत खेड पोलीस पुढील तापस करत आहे.

 


राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातून विद्यार्थी येतात.परंतु काही हुल्लडबाज विद्यार्थ्यांनकडून विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना त्रास देण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत आणि सध्याही दिवसेंदिवस वारंवार घडत आहेत.मागील काळात राजगुरुनगर बसस्थानकात सुद्धा अनेक वेळा विद्यार्थिनीची छेड काढल्याचे प्रकार समोर आले आहेत.

 

 


हुतात्मा राजगुरू महाविद्यालया पासून खेड पोलिस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर असताना अशा मारहाणीच्या घटना घडत आहेत.यामुळे टवाळखोर विद्यार्थ्यांना पोलिसांचा वचक राहिला नाही असेच स्पष्ट होत आहे.पोलिसांनी कडक भूमिका घेऊन हुल्लडबाज तरुणांचा बंदोबस्त करावा.अशी आग्रही मागणी नागरिकांकडून होत आहे.