Corporation election | राजगुरूनगर नगरपरिषद निवडणूक: नगराध्यक्ष पदासाठी शक्तीप्रदर्शन करत ३ उमेदवारी अर्ज दाखल

विविध प्रभागांमध्ये एकूण ३० हून अधिक उमेदवारांनी अर्ज सादर केले

Corporation election | राजगुरूनगर नगरपरिषद निवडणूक: नगराध्यक्ष पदासाठी शक्तीप्रदर्शन करत ३ उमेदवारी अर्ज दाखल

 

महावार्ता लाईव्ह | राजगुरूनगर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. नगराध्यक्ष पदासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आतापर्यंत तीन अपक्ष उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले असून, विविध प्रभागांमध्ये एकूण ३० हून अधिक उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. आरक्षणानुसार महिला, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, नागरिकांचा मागासवर्ग (ना.मा.प्र.) आणि सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांनी उत्साहाने भाग घेतला आहे.


राजगुरूनगर नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी ३ उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये किरण चंद्रकांत आहेर, मंगेश वसंत गुंडाळ, बाप्पू किसन थिगळे यांनी अपक्ष नामनिर्देशनपत्र दाखल केले. 

 

प्रभागनिहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज :

▪️प्रभाग क्रमांक १  :  (ना. मा. प्र)
रेवनाथ मनोहर थिगळे, किशोर संभाजी थिगळे, ( सर्वसाधारण महिला ) थिगळे शोभा विजय, थिगळे साधना बापु

 

▪️प्रभाग क्रमांक २ (ना. मा. प्र ) :  
  सांडभोर कुमार मछिंद्र - ( सर्वसाधारण महिला )      सांडभोर सुवर्णा देविदास 

 


▪️प्रभाग क्रमांक ३ (सर्वसाधारण महिला) :  
  होले मंदा दिलीप, लोखंडे पौलमी ( सर्वसाधारण )        करवंदे योगीराज सुरेश

 

▪️प्रभाग क्रमांक ४ (सर्वसाधारण) :  
      जाधव राजेंद्र लक्ष्मण 

 

▪️ प्रभाग क्रमांक ७ - अनुसूचित जमाती महिला : भांगे       मीनाक्षी संतोष 
(सर्वसाधारण महिला) : घुमटकर सविता शेखर, घुमटकर मेघा कौस्तुभ, घुमटकर सुप्रिया अमित, (ना. मा. प्र ) : घुमटकर वैभव शांताराम, घोरपडे केतन राजन, घुमटकर वैभव लालासाहेब, घुमटकर तेजस महेंद्र 


▪️प्रभाग क्रमांक ८ :  
  - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) : सावताडकर स्वाती मनोज, गुंडाळ आशा अरुण ( सर्वसाधारण ) खांगटे हेमंत आनंद 

 

▪️प्रभाग क्रमांक ९ :   ( सर्वसाधारण ) आवटे सागर नागनाथ, पाचरणे तन्मय मारुती ( ना. मा. प्र महिला ) आवटे अश्विनी सागर 

 

▪️प्रभाग क्रमांक १० : ( अनुसूचित जाती ) गायकवाड अरविंद गजानन, अंकुश सचिन श्रीधर, डोंगरे मित्रसेन प्रकाश यांनी अर्ज दाखल केले.