Crime news | नाणेकरवाडीत ५६२ ग्रॅम गांजा जप्त; २० वर्षीय तरुणाला अटक

चाकण दक्षिण पोलिसांची कारवाई; २८ हजार ९०० रुपयांचा अंमली पदार्थ ताब्यात

Crime news | नाणेकरवाडीत ५६२ ग्रॅम गांजा जप्त; २० वर्षीय तरुणाला अटक

 

महावार्ता लाईव्ह | नाणेकरवाडी परिसरात अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाला चाकण दक्षिण पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून ५६२ ग्रॅम वजनाचा गांजा, अंदाजे २८ हजार ९०० रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.४० वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी संशयावरून आरोपीची चौकशी केली असता आरोपीकडे गांजा आढळून आला.

 

या प्रकरणी कृष्णा सुभाष सवाते (वय २०, रा.समर्थ कॉम्प्लेक्स, बिरदवडी,ता.खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून ५६२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची अंदाजे किंमत २८ हजार ९०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आरोपी हा गांजा बेकायदेशीररीत्या ताब्यात बाळगून त्याची वाहतूक करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

याप्रकरणी मंगेश बाबाजी कापाळे, पोलीस शिपाई चाकण दक्षिण पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.