आळंदी व पंढपूर धर्मशाळेंच्या विकासाची ४० लाखाचा निधी मंजूर

यापुढील काळात देखील दोन्ही धर्मशाळाच्या परिसरात सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार : जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील

आळंदी व पंढपूर धर्मशाळेंच्या विकासाची ४० लाखाचा निधी मंजूर

मंजुरी पत्र स्वीकारताना संत ज्ञानेश्र्वर मंडळाचे सदस्य

 

राजगुरुनगर : संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ खेड तालुका पश्चिम विभाग यांच्या आळंदी आणि पंढरपूर धर्मशाळांच्या परिसरातील विकास कामांसाठी ४० लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी दिली.

 

शरद बुट्टे पाटील यांनी रविवारी (दि.१०) विकासकामांची मंजुरी पत्र संत ज्ञानेश्वर सेवा मंडळाच्या विश्वस्तांकडे सुपूर्द केली.आळंदी येथे चऱ्होली खुदचे परिसरातील भामनेर धर्मशाळेतील बंदिस्त गटार योजनेसाठी १० लाख रुपये आणि सार्वजनिक सभागृहाच्या कामासाठी १० लाख रुपये तर पंढरपूर परिसरातील शेगाव दुमाला ग्रामपंचायत हद्दीतील संस्थेच्या धर्मशाळेच्या परिसरातील रस्त्यांच्या कामासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून २० लक्ष रुपये निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे.सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे या कामी मोठे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
 

 

संत ज्ञानेश्वर सेवा मंडळामध्ये खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील ४० हून  अधिक गावचे सभासद असून गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थांच्या सहभागातून संस्थेने आळंदी व पंढरपूर येथे अतिशय सुसज्ज धर्मशाळा उभारल्या आहेत.४० लाख रुपये निधी मंजुरीचे पत्र बुट्टे पाटील यांनी संस्थेचे सखाराम खेंगले, किसन नवले,मंजू होले,आनंदा आवारी,किसन शिवेकर,बबुशा होले,पोपट रौंधळ,बाळू आहेरकर,स्वप्निल येवले,जयहरी डांगले, शंकर आवारी,सोपान देवाडे,बबन बेंडुरे,विठ्ठल रौंधळ यांचेकडे सुपूर्द केले.