आसखेड खुर्द ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रुख्मिणी लिंभोरे
चाकण : आसखेड खुर्द (ता.खेड) ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.रुख्मिणी भरत लिंभोरे यांची निवड बिनविरोध झाली.निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची अतिशबाजी करीत डीजे लावून आणि गुलाल भंडाराची मुक्तपणे उधळण करीत यांची गावातून मिरवणूक काढली.
ठरल्याप्रमाणे अन्य सदस्यांना सरपंचपदाची संधी मिळावी म्हणून प्रांची लिंभोरे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त सरपंचपदाची निवडणूक ग्रामपंचायतीच्या सभागृहात (दि.२२) रोजी संपन्न झाली. रुख्मिणी लिंभोरे यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी तथा पंचायत विस्तार अधिकारी सेवक थोरात यांनी सदस्यांच्या उपस्थितीत केली.निवडणुकीचे संपूर्ण प्रशासकीय कामकाज ग्रामसेवक तानाजी पाटील यांनी पाहिले. निवडणूक प्रसंगी सभागृहात मावळत्या उपसरपंच व नवनिर्वाचित सरपंच लिंभोरे, मावळत्या सरपंच प्रांची लिंभोरे,ग्रामपंचायत सदस्य संतोष गावडे, सोनाली लिंभोरे,अश्विनी लिंभोरे उपस्थित होते.तर सुनीता लिंभोरे या सदस्या गैरहजर होत्या.निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.निवडीनंतर सरपंचासह सदस्यांचा फेटा बांधून सत्कार झाला.
निवडीवेळी बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब लिंभोरे,व्हा.चेअरमन माऊली शिंदे,सचिन लिंभोरे,तंटामुक्ती प्रकाश लिंभोरे,शिवाजी लिंभोरे, भरत लिंभोरे,चांगुणाबाई लिंभोरे,सखुबाई लिंभोरे,बबन लिंभोरे, सदाशिव लिंभोरे,काशिनाथ लिंभोरे, अशोक लिंभोरे,तुकाराम लिंभोरे,कांताराम लिंभोरे,राजाराम लिंभोरे,संतोष लिंभोरे,युवराज लिंभोरे,दिनेश लिंभोरे,अभिषेक लिंभोरे,काळुराम लिंभोरे,सुनील लिंभोरे,गणेश लिंभोरे,बाळासाहेब कोऱ्हाळे, दत्तात्रय कोऱ्हाळे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
