भारतीय जनता माथाडी युनियनच्या पुणे जिल्हा सरचिटणीसपदी मिलिंद जगदाळे यांची निवड

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेक्षाध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये मिलींद जगदाळे यांचा प्रवेश करण्यात आला.

भारतीय जनता माथाडी युनियनच्या पुणे जिल्हा सरचिटणीसपदी मिलिंद जगदाळे यांची निवड

राजगुरूनगर : भारतीय जनता माथाडी आणि सुरक्षारक्षक जनरल युनियनच्या पुणे जिल्हा ग्रामीण विभाग सरचिटणीसपदी राजगुरूनगरचे उद्योजक मिलिंद विठ्ठल जगदाळे यांची नियुक्ती झाली.

युनियनचे संस्थापक अनुप मोरे,अध्यक्ष विजय हरगुडे, व संघटक नासिर शेख यांनी जगदाळे यांच्यावर पुणे ग्रामीण सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली.तसेच जगदाळे यांचा भाजपात प्रवेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेक्षाध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत बावनकुळे, विक्रांत पाटील,इमरान शेख यांचे प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी बावनकुळे यांनी जगदाळे यांच्या गळयात पक्षाचे चिन्ह असलेले कमळ उपरणे घालून आणि पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत करीत सत्कार केला.

आपण असंघटीत व असुरक्षित क्षेत्रातील सर्व आस्थापनामधील कामगारांना तसेच कंपनी गोडाऊनसह सर्वच स्तरातील,अस्तरातील कामगारांना संघटीत करून त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तसेच माथाडी व कामगार कायद्याचे संरक्षण देत विविध लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करणार असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.