Khed | किवळे नंतर कुरकुंडीत बिबट्याचा पुन्हा पशुधनावर हल्ला
भोकसे या शेतकऱ्यांच्या कालवड (गाय) बिबट्याच्या हल्ल्यात मुत्यमुखी पडली | नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण | वन विभागाचे दुर्लक्ष | दोन दिवसात शेजारील गावात बिबट्याचा हल्ला
राजगुरूनगर : खेड तालुक्यात पशुधनावर बिबट्याचे हल्ले सुरूच असून किवळे गावानंतर नंतर कुरकुंडी गावातील आनंदा गणपत भोकसे या शेतकऱ्यांच्या कालवड (गाय) बिबट्याच्या हल्ल्यात मुत्यमुखी पडली आहे. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.
कुरकुंडी गावातील गट नंबर 622/623 कुरकुंडीची राळेवस्ती येथे ही घटना घडली.या घटनेने गावातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.दोन दिवसापूर्वी किवळे गावाच्या हद्दीत बिबट्याने लहान कालवड या पशुधनावर हल्ला करून ठार केले.ही घटना ताजी असताना तिसऱ्याच दिवशी अगदी किवळेच्या शेजारच्या कुरकुंडी गावात आज कालवड असलेल्या मोठ्या गाय या पशुधनावर हल्ला करून गाय ठार झाली.किवळे आणि कुरकुंडी गावात बिबट्याच्या हल्ल्याने दोन्ही गावातील नागरिक प्रचंड घाबरले आहेत.
राजगुरूनगर वन विभागाचे प्रमुख अधिकारी ,वनपाल,वनरक्षक यांना बिबट्याला पकडण्याची मागणी करूनही वन विभागाने काहीच कार्यवाही केली नाही.विशेष म्हणजे वन विभागाने मृत पशुधनाचा पंचनामा करण्यापलीकडे दुसरे काहीच कार्य केले नाही. नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली पण पिंजरा लावला नाही आणि तिसऱ्याचा दिवशी कुरकुंडी गावात बिबट्याने कालवडीवर हल्ला करून ठार केले.या घटनेला वन विभाग जबाबदार असल्याचा आरोप पशुधन मालकाने केला.
किवळेच्या घटनेनंतर नागरिकांच्या मागणीनुसार वन विभागाने पिंजरा लावला असता तर आज कुरकुंडी गावात दुसरी घटना घडली नसती.वन विभाग सपशेल कुचकामी ठरला आहे. अधिकारी आणि कर्मचारी हे कार्यालयात बसून असतात आणि घटना घडल्यानंतर घटनास्थळी जातात.पण अगोदर काहीच उपाययोजना करीत नाहीत हे मोठे दुर्दैव आहे.नुकसानग्रस्त पशुधन मालक यांनी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली.
