Shirur loksabha | आढळराव पाटलांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याचा भाजपचा निर्धार

मोदीच आपले उमेदवार आहेत असे समजून सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार करावा संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांचे भाजप कार्यकर्त्यांना अहवान

Shirur loksabha | आढळराव पाटलांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याचा भाजपचा निर्धार

 

राजगुरुनगर | शिरूर लोकसभेतील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठीमागे भक्कम पणे उभे राहण्याचा निर्धार आज झालेल्या खेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या बैठकीमध्ये करण्यात आला.

खेड तालुक्यात घडलेल्या काही घडामोडी च्या पार्श्वभूमीवर आज भाम येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयामध्ये खेड तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे प्रदेश जिल्हा आणि तालुक्याचे पदाधिकारी आणि आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या बैठकीमध्ये हा निर्धार व्यक्त करण्यात आला.

 

 

 

आपल्यासाठी देश महत्त्वाचा असून देशाच्या प्रगतीसाठी मोदीजी महत्वाचे आहेत. त्यामुळे मोदीच आपले उमेदवार आहेत असे समजून सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार करावा असे आवाहन यावेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी केले.

 

यावेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, प्रदेश निमंत्रित सदस्य राम गावडे, आळंदीचे नगराध्यक्ष अशोक उमरगेकर, राजगुरुनगरचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, नगरसेवक रामभाऊ भोसले, जिल्ह्याचे सरचिटणीस संजय रौंधळ आणि भगवान शेळके उपाध्यक्ष गणेश सांडभोर, दत्ताभाऊ खांडेभराड, तालुका महिला मोर्चा अध्यक्ष कल्पना पाटील गवारी,पश्चिम महाराष्ट्र विभाग समन्वय योगेशजी बाचल,सहकार आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष शेखर शेटे, जिल्हा कोषाध्यक्ष मनोज मांजरे, राजनभाई परदेशी, सुनिल देवकर, महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष शिवाकाली खेंगले, सरचिटणीस रत्नाताई पिंगळे, निर्मला कवडे, दीप्ती कुलकर्णी, दत्तात्रय वाडेकर, पंचायत समिती माजी सदस्य अमृतनाना शेवकारी, माजी तालुकाध्यक्ष दिलीप वाळके, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष काळुराम पिंजन, सचिन गायकवाड, किरण येळवंडे, चाकण शहर प्रभारी भगवान मेदनकर, कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष शाम पुसदकर, लोकसभा समन्वयक संदीप सोमवंशी, तालुका सरचिटणीस अक्षय पऱ्हाड, ज्ञानेश्वर बनसोडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संदेश जाधव, रामदास कड, प्रमोद कड, अतुल कुऱ्हाडे, सुनिल झांबरे, दत्तात्रय सुतार, संतोष ओतारी, राहुल ओव्हाळ, विजय राणे, अनिल सोनवणे, श्रीराम खेडकर, योगेश देशमुख, विशाल परदेशी, मंगेश देसाई, किशोर कुमठेकर, रवींद्र वाडेकर, अमित सिंग, सोशल मीडिया प्रमुख बाजीराव बुचुडे, हरिदास गोकुळे, सरपंच निकिता गावडे,  सुनिल बारणे, रामदास खेंगले, अमोल विरकर, दत्तात्रय सांडभोर, अध्यात्मिक आघाडी जिल्हा संयोजक गुलाब नाना खांडेभराड, प्रणव केदारी,  योगेश नलावडे, पंढरीनाथ सुतार इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

यावेळी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील भाजपचे कार्यकर्ते सर्व बूथ वर जाऊन महायुतीचे उमेदवारांचा प्रचार करतील अशी माहिती दिली. यावेळी शेखर शेटे,राम गावडे,अमृत शेवकरी,भगवान मेदनकर,पाटील गवारे,आप्पा बारणे,गुलाब खांडेभराड,सूर्यकांत मुंगसे,बंडू सोनवणे,यांनी प्रचार नियोजनाबाबत सूचना केल्या. खेड भाजपा तालुकाध्यक्ष शांताराम भोसले यांनी आभार मानले.