Khed | ढुम्या डोंगर परिसरात वृक्षारोपण करून पाच मान्यवरांचा वाढदिवस उत्साहात साजरा
वडाच्या वृक्षारोपणाने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश ; ढुम्या मारुती गिरीभ्रमण मंडळाच्या पुढाकाराने अनोखा वाढदिवस सोहळा
महावार्ता लाईव्ह | मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी ऊर्जा केंद्र आणि निरोगी आरोग्याचे वरदान ठरलेल्या राजगुरूनगरजवळील ढुम्या डोंगर परिसरात वडाच्या झाडाचे रोपण करून पाच मान्यवरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. ढुम्या मारुती गिरीभ्रमण मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात राजगुरूनगरचे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. पोपटराव तांबे, सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार सोपानराव राक्षे, अॅड. पांडुरंग राऊत, उद्योजक बबनराव होले आणि माजी उपसरपंच अॅड. प्रकाश तळेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
१ मे २०२६ रोजी सकाळी ढुम्या मारुती मंदिराच्या प्रांगणात हा वाढदिवस सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी पाचही मान्यवरांच्या हस्ते वडाच्या झाडाचे रोपण करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर भरजरी फेटे बांधून, कपाळी गंध लावून औक्षण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील कार्याचा गौरव करत शुभेच्छांचा वर्षाव केला. यानंतर ढुम्या ग्रुपच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापण्यात आला.

या कार्यक्रमाला ढुम्या मारुती गिरीभ्रमण मंडळाचे अध्यक्ष नामदेव चव्हाण, मंडळाचे कार्याध्यक्ष व उद्योजक ज्ञानेश्वर उर्फ माऊलीशेठ करंडे, सचिव व ज्येष्ठ पत्रकार दत्ता भालेराव, खजिनदार विशाल राक्षे, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाळासाहेब सांडभोर, अॅड. रामचंद्र घोलप, खेड टाईम्सचे संपादक रोहिदास होले, सुधाकर जाधव, नंदकुमार होले, नरेंद्र उर्फ लाला सावंत, अजित डोळस, अॅड. दिलीप करंडे, शामकांत व शशिकांत खळदकर, जयंत घोरपडे, अभिमन्यू सोनवणे, कैलासराव मुसळे, कैलास दुधाळे, पत्रकार संदीप मिरजे, शशिकांत गिलबिले, विकास सांडभोर, अमित कातळे, गगणपत पाटोळे, राहुल शिंदे, दत्ता वडगावकर, काका कुलकर्णी, शंकर बोंबले यांच्यासह मंडळाचे अनेक सदस्य उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना बाळासाहेब सांडभोर, कैलासराव मुसळे, दत्ता भालेराव, रामचंद्र घोलप, जयंत घोरपडे, दत्ता वडगावकर आणि संदीप मिरजे यांनी पाचही मान्यवरांच्या यशस्वी कारकिर्दीचा विशेष उल्लेख करत त्यांना निरोगी व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना अॅड. पोपटराव तांबे आणि सोपानराव राक्षे यांनी ढुम्या मारुती गिरीभ्रमण मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत उपस्थित सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमामुळे वाढदिवसाचे मानकरी विशेषतः भारावून गेले होते.
