खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,काँग्रेस या पक्षाकडून ठिकठिकाणी लखीमपूर घटनेचा मोर्चाद्वारे जाहीर निषेध.
राजगुरूनगर : प्रतिनिधी
उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये शेतकरी मोर्चात केंद्रीय राज्यमंत्र्याच्या मुलाने थार कंपनीची गाडी मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या अंगावर घालून ७ निष्पाप शेतकऱ्यांना चिराडण्यात आले.या घटनेचा निषेध खेड तालुका राष्ट्रवादी,शिवसेना, काँग्रेस या तीन पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी तालुक्याच्या अनेक ठिकाणी संयुक्तपणे मोर्चे काढले.खेड तहसीलदारांना या घटनेबाबत निवेदन देण्यात येऊन भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला.
राजगुरूनगर शहरातून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य कैलास सांडभोर,राजगुरूनगर शहराध्यक्ष सुभाष होले,माजी तालुकाप्रमुख गणेश सांडभोर, माजी सभापती अरुण चांभारे, शांताराम चव्हाण,महिला आघाडी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा मनीषा सांडभोर,वैभव घुमटकर,वैभव नाईकरे,किरण थिगळे आदींनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले.

चाकण शहरातून काढलेल्या मोर्चात पुणे जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जमीर काझी,राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष राहुल नायकवाडी,किसान आघाडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गोरे,जिल्हा राष्ट्रवादीचे खजिनदार भगवान मेदनकर, राष्ट्रवादीचे चाकण शहराध्यक्ष राम गोरे,काँग्रेसचे चाकण शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,काँग्रेसचे प्रवक्ते निलेश कड,आडते असोसिएशनचे अध्यक्ष कुमार गोरे,काँग्रेसच्या महिला अध्यक्षा गीताबाई मांडेकर,चाकण गावचे माजी उपसरपंच अशोक बिरदवडे,अनिल देशमुख, उद्योजक अशोक जाधव, उद्योजक विजय खाडे,तालुका राष्ट्रवादी युवकचे मुख्य प्रवक्ते व्यंकटेश सोरटे,चाकण शहर अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष मुबीन काझी,वितरण सहाय्य समितीचे सदस्य दत्ता गोरे,अमोल नामदेव जाधव,सतीश वाव्हळ, कालिदास गोरे, शांताराम आगरकर आदीसह शेतकरी सहभागी होते.मोर्चातील सर्वांनी लखीमपूर घटनेचा जाहीर निषेध केला.

-------------------------------------------
