Khed panchyat samiti | अश्विनी सोमनाथशेठ तरस महाळुंगे गणातून विक्रमी मतांनी विजयी

७३७७ इतक्या मताधिक्याने निवडून येण्याचा रचला खेड तालुक्यात इतिहास

Khed panchyat samiti | अश्विनी सोमनाथशेठ तरस महाळुंगे गणातून विक्रमी मतांनी विजयी

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील महाळुंगे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी सोमनाथ तरस यांचा ७३७७ अशा रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी झाला. अश्विनी तरस यांनी पंचायत समिती गणातून एवढ्या प्रचंड मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम खेड तालुक्याचे इतिहासात केला आहे.

 

महाळुंगे पंचायत समितीचा गण सर्वसाधारण महिला असल्याने या गणातून अश्विनी तरस राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार),दिपाली बवले शिवसेना (उबाठा) व अर्चना गाडे शिवसेना (शिंदेगट) असा तिरंगी सामना झाला.तरस यांना एकूण ९५४९ मतदान झाले तर प्रतिस्पर्धी उमेदवार बवले यांना फक्त २१७२  मतदान झाले.गाडे यांना नीचांकी ५६८ मतदान झाल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त झाले.मतदानाच्या आकडेवारीवरून शिवसेना पक्षाचे दोन्ही उमेदवारांनी तरस यांना यांच्यापुढे तक धरला नाही.मतदानाच्या एकूण १५ फेऱ्या होत्या.शिवसेना शिंदे गटाच्या गाडे उमेदवार यांना प्रत्येक बुथवर दोन अंकी संख्या होती, तर दोन बुथवर फक्त १२८,१११ अशा दोन ठिकाणी तीन अंकी मतदान झाले.तर बवले या उमेदवाराला तीन बुथवर दोन अंकी मतदान झाल्याचे निकालाने स्पष्ट झाले.तरस यांच्या मतदानापैकी २५ टक्के देखील मतदान शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना मिळाले नाही. 

 

मतदानाच्या १५ फेऱ्यांपैकी प्रत्येक फेरीत अश्विनी तरस यांना मोठे मतदान झाल्याचे आकडेवाडी वरून दिसत आहे.खेड तालुक्याच्या महाळुंगे पंचायत समिती गणातून ७३७७ एवढ्या प्रचंड मतांनी निवडून येण्याचा इतिहास अश्विनी तरस यांनी केला आहे. सावरदरी, महाळुंगे, खालुंबरे, शिंदेगाव, वासुली, सांगुर्डी, येलवाडी, कानेवाडी तर्फे चाकण आठ गावांमध्ये तरस यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले. तसेच शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या गावात अश्विनी तरस यांनाच मतांची आघाडी मिळाल्याचे स्पष्ट आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळाल्याने आणि गावाला तालुकास्तरावर काम करण्याची संधी मिळणार असल्याने अश्विनी तरस यांना निवडणुकीत विजयी करण्यासाठी सावरदरी गावाने आपापसातील सर्व मतभेद विसरून एक झाले होते.उद्योजक सोमनाथ तरस व गावचे माजी सरपंच भरत तरस यांच्या बरोबरीने गावातील नागरिकांनी प्रचार केला.त्यामुळे प्रचारात देखील संपूर्ण गाव एकवटल्याचे दिसत होते. गावच्या एकीचा फायदा या निवडणुकीत दिसून आला.

 

अश्विनी तरस यांचे महाळुंगे गाव हे माहेर असून सावरदरी गाव सासर आहे.त्यांची दोन्ही गावे महाळुंगे गणात असल्याने याचाही फायदा त्यांना झाला.तसेच देवदर्शन यात्रेचा आणि लक्ष्मीदर्शन याचाही फायदा तरस यांना निवडणुकीत झाला.या दोन्ही गावात त्यांनी मतांची मोठी आघाडी घेतली. विजयी झाल्यावर तरस यांची डीजे लावून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत ग्रामस्थांनी गुलाल भंडाराची मुक्तपणे उधळण करीत जल्लोष केला.महाळुंगे गणातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळविल्याने अश्विनी सोमनाथ तरस यांच्यावर गणातील मतदार आणि हितचिंतक व मित्र परिवार नातेवाईक यांच्याकडून शुभेच्छा देत अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



महाळुंगे गणाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून त्या दृष्टीने गणातील गावांमध्ये प्राधान्याने विकासकामे करणार आहे - नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या अश्विनी सोमनाथशेठ तरस