चाकण परिसरातील कंपनीच्या स्टोअररूम मधून सव्वाचार लाखांचा ऐवज चोरीला
सावरदरी गावातील घटना : चार लाख २४ हजार ५०० चा ऐवज चोरीला
चाकण - न्यूज नेटवर्क
चाकण परिसरातील सावरदरी गावात एका कंपनीशेजारी असलेल्या स्टोअर रूममध्ये तीन ते चार चोरट्यांनी घरफोडी केली. यात चोरट्यांनी चार लाख २४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.
ही घटना २७ फेब्रुवारी रात्री सात ते २८ फेब्रुवारी मध्यरात्री दोनच्या कालावधीत घडली. श्रीधर गणेश गुरव (वय ४७, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन ते चार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरदरी गावच्या हद्दीत बडवे इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीच्या बाजूला स्टोअर रूम आहे. २७ फेब्रुवारी रात्री सात ते २८ फेब्रुवारी मध्यरात्री दोन वाजताच्या कालावधीत अज्ञात तीन ते चार चोरट्यांनी स्टोअर रूमचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चार लाख २४ हजार ५०० रुपये किमतीचे दुचाकीचे अल्युमिनियम धातूचे शॉकऑपझर आऊटर ट्यूब चोरट्यांनी चारचाकी वाहनात भरून चोरी करून नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
-----------------------------------------------------------
