कोरेगांव खुर्द ग्रामपंचायतीचा कारभार महिलांच्या हाती
सारपंचपदाचा कारभार सौ.सीमा झांबरे यांनी स्वीकारला तर उपसरपंचपदी सौ.विद्या कडूसकर यांची बिनविरोध निवड
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्द ग्रामपंचायत सरपंचपदाचा अधिकृत पदभार सौ.सीमा राजू झांबरे यांनी स्वीकारला.तर उपसरपंचपदी सौ.विद्या सतीश कडूसकर यांची बिनविरोध निवड झाली.निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच यांचा शाल,श्रीफळ व गळ्यात पुष्पहार घालून सत्कार सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.
सरपंचपदाच्या निवडणुकीत सीमा झांबरे निवडून आल्यानंतर त्यांनी (दि.३) रोजी सरपंचपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला.उपसरपंचपदाची निवडणूक सरपंच झांबरे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली.विद्या कडूसकर यांचेच एकमेव उपसरपंचपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा त्यांनी सभागृहात सदस्यांच्या उपस्थितीत केली.निवडणूक निरीक्षक म्हणून बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश वाघमारे व विस्तार अधिकारी अमित लोंढे होते.ग्रामसेविका ज्योती कुदळे यांनी प्रशासकीय कामकाज पाहिले.पोलीस बंदोबस्तात निवडणूक खेळीमेळीच्या वातावरण पार पडली.
निवडणूक प्रसंगी सभागृहात ग्रामपंचायत सदस्य प्रकाश दोंद पाटील,रामदास गावडे,रंजना थोरात,जया कडूसकर,जिजाबाई मेंगळे,सइंद्राबाई गावडे,होनाजी मेंगळे हे होते.तर काळूराम गाळव गैरहजर राहिले.यावेळी माजी उपसरपंच राजू झांबरे,नितीन कडूसकर,साहेबराव कडूसकर,रामदास कडूसकर,भीमराव जाचक,गणेश थोरात,रोहिदास कडूसकर,सोपान मेंगळे,किसन गोगावले, दत्तात्रय घनवट,हिरामण गावडे,शिवनाथ झांबरे,अनिल झांबरे,सुनील घनवट,भाऊसाहेब लोंढे,शांताराम झांबरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
