आसखेड बुद्रुक गावचे उपसरपंचपदी सौ संध्याताई सागर तांबे यांनी निवड.
पंचायत समितीची निवडणूक लढविण्याचा मनोदय.
राजगुरूनगर : न्यूज नेटवर्क
खेड तालुक्यातील आसखेड बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.संध्याताई सागर तांबे यांची बिनविरोध निवड झाली.निवडीनंतर गुलाल भंडाराची मुक्तपणे उधळण करीत त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.
ठरल्याप्रमाणे प्रमिला गाडे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त उपसरपंचपदाची निवडणूक सरपंच ताईबाई सप्रे यांचे अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी (दि.११) संपन्न झाली.संध्याताई तांबे यांचेच उपसरपंचपदाकरिता नामनिर्देशनपत्र आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच सप्रे यांनी सदस्यांच्या उपस्थितीत सभागृहात केली.निवडणूकीसाठी सरपंच ताईबाई सप्रे,मावळत्या उपसरपंच प्रमिला गाडे, ग्रामपंचायत सदस्य आशाताई सोंडेकर,जयश्री गाडे,सुभाष गाडे,नवनाथ गावडे उपस्थित होते.निवडणुकीचे प्रशासकीय कामकाज ग्रामसेविका सुनीता चौधरी यांनी पाहिले.

यावेळी पोलिस पाटील नितीन गाडे, हिंदूराष्ट्र सेना तालुकाध्यक्ष बाबाजी सोडेकर, कालिदास तांबे,माजी सरपंच दत्तात्रय तांबे,वनेश्वर मोरे ,पांडुरंग सोंडेकर, सुदाम सोंडेकर, राकेश गाडे, किशोर गाडे, संतोष गाडे, अरुण सोंडेकर आदी उपस्थित होते.
मधूकरशेठ तांबे यांनी आसखेड बुद्रुक सोसायटीचे २० वर्षे चेअरमनपदावर कार्य केल्याने त्यांचे सोसायटीवर कायम वर्चस्व राहिले.मधुकर तांबे यांचे राजकिय वारसदार म्हणून शिवनेनेचे युवानेते सागर तांबे आहेत.आता सागर तांबे यांच्या पत्नी संध्याताई तांबे यांना उपसरपंचपद मिळाल्याने आता आगामी होणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवार म्हणून संध्या तांबे यांनी चर्चा परिसरात सुरू झाली.
--------------------------------------------------------------------------
