Rajgurungar | हुतात्मा राजगुरू,भगतसिंग,सुखदेव पुण्यतिथी तथा शहीददिनी अनेक मान्यवरांकडून अभिवादन

हुतात्मा राजगुरू यांच्या जीवनावर आधारित पथनाट्य,देशभक्ती गीते,मशाली पेटवून राजगुरूनगर शहरात भव्य मिरवणूक काढून अभिवादन करण्यात आले

Rajgurungar | हुतात्मा राजगुरू,भगतसिंग,सुखदेव पुण्यतिथी तथा शहीददिनी अनेक मान्यवरांकडून अभिवादन
 

राजगुरुनगर : भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे देशाचे महान सुपुत्र,थोर क्रांतिवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू,भगतसिंग व सुखदेव या क्रांतिवीरांच्या पुण्यतिथी तथा शहीददिनी अनेक मान्यवरांनी राजगुरूनगरच्या पुणे-नाशिक महामार्गवरील स्मृतिशील्पस्थळ मधील हुतात्मा राजगुरू,भगतसिंग,सुखदेव यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. 

 
 
 
 

https://www.facebook.com/share/v/veGQuMinB5Em3wQE/?mibextid=oFDknk

हुतात्मा राजगुरुंचे जन्मस्थळ असलेल्या हुतात्मा राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू यांच्या हस्ते वाड्यावर ध्वजारोहण करत क्रांतीकारकांना मानवंदना देण्यात आली.हुतात्मा राजगुरू, भगतसिंग,सुखदेव स्मृतिशील्पस्थळ व हुतात्मा राजगुरुंच्या जन्मस्थळावर विविध फुलांच्या माळांची भव्य सजावट केली होती.

 

यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील,प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, तहसीलदार प्रशांत बेडसे,पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे,गटविकास अधिकारी विशाल शिंदे, हुतात्मा स्मारक समिती अध्यक्ष अतुल देशमुख,खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड देवेंद्र बुट्टे पाटील, राजगुरूनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल,उपाध्यक्ष अविनाश कहाणे,हुतात्मा राजगुरू प्रतिष्ठानचे अध्यक्ष कोंडीभाऊ टाकळकर,अँड मुकुंदराव आवटे,भाजपाचे तालुकाध्यक्ष शांताराम भोसले,हिरामण सातकर,भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष व  तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस,भाजपचे राम गावडे, गणेश सांडभोर,रजनी नाईक, मनीषा टाकळकर,माणिक पाटोळे, मारुती सातकर,बीएम सांडभोर,सुदाम कराळे,अशोक दुगड, प्रा बापू चौधरी,प्रकाश पाचारणे,बाबासाहेब हजारे,प्रा.कैलास पाचारणे,दिलीप होले,बाळासाहेब सांडभोर,सुनील वाळुंज, यांच्यासह विविध संस्था,संघटना,राजकीय पक्ष यांच्या पदाधिकाऱयांनी स्मृतिशिल्पातील हुतात्मा भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या पुतळ्यास व पुष्पहार घालून अभिवादन केले तसेच जन्मस्थळ हुतात्मा राजगुरू यांच्या वाड्यावर अनेकांनी अभिवादन केले.

 

हुतात्मा राजगुरु स्मारक समितीकडुन रक्तदान शिबीर घेण्यात येऊन रक्तदान केलेल्यांना समिती कडून सन्मान पत्र व हुतात्मा राजगुरू यांचे फोटोफ्रेम देण्यात आली. राजगुरुवाड्यावर क्रांतीकारकाचा धकधकत्या इतिहासाचे चिमुकल्या मुलांनी नृत्याचे सादरीकरण केले.यावेळी मोठ्या संख्येने देशभक्तांनी हजेरी लावली.सायंकाळी हुतात्मा राजगुरू,भगतसिंग,सुखदेव यांच्या जीवनावर आधारित पथनाट्य,देशभक्ती गीते,मशाली पेटवून राजगुरूनगर शहरात भव्य मिरवणूक काढून अभिवादन करण्यात आले.