खेड तालुक्यात दावडी येथील घटना ; १५ मोरांचा मृत्यू
राजगुरूनगर : खेड तालुक्याच्या दावडी गावातील लोणकरवाडी येथे १५ मोरांचा मूत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना दि.१६ रोजी उघडकीस आली. मोरांच्या मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
दिवसेंदिवस उन्हाचा वाढता तडाखा अथवा काहीतरी खाण्यात आल्याने झालेली विषबाधा हे कारण त्यामागे असू शकते असा अंदाज व्यक्त होत आहे. खेड वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन मुत्युमुखी पडलेले मोरांचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले.
------------------------------★★★---------------------------------
