Corporation election | राजगुरूनगर नगरपरिषद निवडणूक: पाचव्या दिवशी १२ उमेदवारी अर्ज दाखल; नगराध्यक्ष पदासाठी अद्याप शून्य अर्ज

भाजपाकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल ; शिवसेना (शिंदे गट) सर्वात सक्रिय ठरली

Corporation election | राजगुरूनगर नगरपरिषद निवडणूक: पाचव्या दिवशी १२ उमेदवारी अर्ज दाखल; नगराध्यक्ष पदासाठी अद्याप शून्य अर्ज

 

महावार्ता लाईव्ह | राजगुरूनगर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पाचव्या दिवशी एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, सर्वांच्या लक्षवेधी असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी अद्याप एकही उमेदवारी नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही. यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

 

पक्षनिहाय पाहता, पाचव्या दिवशी भाजपाकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. शिवसेना (शिंदे गट) सर्वात सक्रिय ठरली असून, त्यांच्याकडून ४ अर्ज दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून १ अर्ज दाखल झाला आहे. याशिवाय अपक्ष उमेदवारांनीही आपली ताकद दाखवली असून, विविध प्रभागांमधून अपक्ष अर्जांची संख्या लक्षणीय आहे.

 

 प्रभागनिहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज:

▪️प्रभाग क्रमांक २ (सर्वसाधारण) :  
बाळासाहेब शंकर सांडभोर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

 

▪️प्रभाग क्रमांक ४ (सर्वसाधारण) :  
  निलेश बाळासाहेब गवते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.  
  धिरज विजय आदक यांनी शिवसेना - शिंदे गटाकडून नामनिर्देशनपत्र सादर केले.

 

▪️प्रभाग क्रमांक ५ (सर्वसाधारण महिला) :  
  ज्योती संदीप वाडेकर यांनी  शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.

 

▪️प्रभाग क्रमांक ६ (सर्वसाधारण) :  
  संतोष मारुती सांडभोर यांनी शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल केला.

 

▪️ प्रभाग क्रमांक ७ ना.मा.प्र : बाळू जयराम डोके - शिवसेना व अपक्ष अर्ज दाखल केला.

 

▪️प्रभाग क्रमांक ९ :  
  - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) : कविता सुनिल वाळुंज यांनी  अपक्ष अर्ज दाखल केला.  
  -  सर्वसाधारण : सागर वसंतराव सातकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि अपक्ष अशी दुहेरी उमेदवारी दाखल केली.  
  - नितीश सतीश ओसवाल यांनी  भाजपा आणि अपक्ष म्हणून अर्ज सादर केले.

 

निवडणूक प्रक्रियेच्या पाचव्या दिवशी दाखल झालेल्या या १२ अर्जांमुळे प्रभागनिहाय स्पर्धा तीव्र होताना दिसत आहे. विशेषतः प्रभाग ९ मध्ये एकाच उमेदवाराने पक्षीय आणि अपक्ष अशी दुहेरी उमेदवारी दाखल करून राजकीय रणनीतीचा नवा आयाम उघड केला आहे. भाजपाचा पहिला अर्ज आणि शिवसेना (शिंदे गट)ची आक्रमकता यामुळे महायुतीतील समन्वय कसा राहील, याकडे लक्ष लागले आहे.

 

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत संपण्यास अद्याप काही दिवस शिल्लक असले तरी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांची प्रतीक्षा कायम आहे. येत्या काही दिवसांत प्रमुख पक्षांचे दिग्गज मैदानात उतरतील, अशी चर्चा आहे. राजगुरूनगरकरांच्या अपेक्षा आणि विकासाच्या मुद्द्यांवर आधारित ही निवडणूक आता अधिकच रंजक होत चालली आहे.