खेड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने महावितरण कार्यालयावर धरणे आंदोलन

शेतकऱ्यांचे वीज पंपांचे कनेक्शन जोडले नाही व महावितरण ने मनमानी कारभार थांबला नाही तर या पुढील काळात उग्र आंदोलन करू - जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील / अतुल देशमुख

खेड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने महावितरण कार्यालयावर धरणे आंदोलन

राजगुरूनगर : प्रतिनिधी

खेड तालुक्यातील शेतकरी बांधवांचे तोडण्यात आलेले शेती पंपाचे वीज कनेक्शन तात्काळ पूर्ववत करावे या संदर्भात  ( दि.२ मार्च ) राजगुरुनगर येथील वाडारोड रस्त्यावरील महावितरणच्या कार्यालयावर खेड तालुका भारतीय जनता  पक्षाच्या वतीने पंचायत समिती ते महावितरण कार्यालय मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनाचे नेतुत्व पुणे जिल्हा परिषद (BJP) गटनेते शरद बुट्टे पाटील, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख व भाजप तालुका अध्यक्ष शांताराम भोसले यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, माजी सरपंच दत्ता मांडेकर, उपाध्यक्ष सुनील देवकर,माजी अध्यक्ष दिलीप वाळके, सचिन लांडगे, उपसरपंच रोहित डावरे,बाळासाहेब कहाणे, सरपंच सुधीर भोमाळे, देविदास बांदल ,देविदास बांदल ,संदेश जाधव यांच्यासह पदाधिकारी , शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांचा तात्काळ वीजपुरवठा पूर्ववत करून घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.  

खेड तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने महावितरण यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध  राजगुरूनगर येथील महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी खेड तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.खेड तालुक्यातील शेतकरी बांधवांचे तोडण्यात आलेले शेती पंपाचे वीज कनेक्शन तात्काळ पूर्ववत करावे या संदर्भात आज भारतीय जनता पार्टीखेड तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढुन निषेध व्यक्त केला. आत्महत्या होण्याच्या दुर्घटना देखील होऊ शकतात त्यामुळे असा अनुचित प्रकार घडू नये व वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी महावितरणचे कार्यकारी अभियंता ठाकरे साहेब यांच्याकडे करण्यात आली.

महावितरण कंपनीने वीज बिल भरलेल्या शेतकऱ्यांची शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित केला आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची गेली अनेक महिने वीजबिल आलीच नाही तरी ही वीज बिल भरले नाही म्हणून वीज पुरवठा खंडित केला आहे त्यामुळे होणारा दंड शेतकऱ्यांच्या माथी मारला जातो. शेतकरी वारंवार महावितरण कार्यालयात वीजबिल दुरुस्तीसाठी हेलपाटे मारूनही त्यांना सहकार्य होत नाही उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. शासनाची वीजबिल सवलतीची योजना फसवी असून त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना वीज बिल वाढवून देण्यात आली आहेत. शेती पंपाची व घरगुती मीटर रीडिंग घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदार एजन्सी रीडिंग घेतच नाहीत आणि त्याचा मोबदला मात्र घेतात यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार असून दोषींवर कारवाई करावी अशी  मागणी यावेळी करण्यात आली. विविध गावच्या पाणीपुरवठा योजनेचे विज पुरवठा देखील खंडित केला गेला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या वीज पंपाचा रात्रीचा विज पुरवठा करण्याऐवजी दिवसा दहा तास वीज पुरवठा करावा तो आजही होत नाही. 

पश्चिम पट्ट्यातील सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी डेहणे व कुडे बुद्रुक येथे वीज उपकेंद्र मंजुरी प्रलंबित आहेत या विविध मागण्यासाठी खेड तालुका भारतीय जनता पार्टी तसेच शेतकऱ्यांच्या वतीने महावितरणाच्या कारभाराविरुद्ध महावितरणाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. खेड तालुका भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने जिल्हा परिषद सदस्य गटनेते शरद बुट्टे पाटील, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, भाजपा तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, देविदास बांदल यांनी तीव्र शब्दात प्रामुख्याने आपले निषेध व्यक्त केले.

--------------------------------------------------------------

याबाबत तात्काळ कारवाई केली जाईल .भरमसाठ असलेल्या वीज बिलांची चौकशी करून ती बिले वेळीच दुरुस्ती केली जाईल . २० सब  स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून सुरू केले जाईल. तालुक्यातील नागरिकांना आंदोलन करावे लागेल अशी वेळ पुन्हा येऊ देणार नाही -

मनीष ठाकरे , कार्यकारी अभियंता महावितरण

-------------------------------------------------------------