६७ व्या वाढदिवसानिमित्त दिलीप मोहिते पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव; रत्नाई निवासस्थानी दिवसभर जनसागर

जनतेचा वाढता प्रतिसाद आणि सर्वपक्षीय उपस्थितीमुळे दिलीप मोहिते पाटील यांचे खेड तालुक्यातील राजकीय व सामाजिक वजन कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट..!

६७ व्या वाढदिवसानिमित्त दिलीप मोहिते पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव; रत्नाई निवासस्थानी दिवसभर जनसागर

 

महावार्ता लाईव्ह | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा खेड-आळंदी मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा ६७ वा वाढदिवस २९ मे २०२६ रोजी साधेपणाने, मात्र उत्स्फूर्त जनसहभागात साजरा झाला. संघर्षातून नेतृत्व घडविलेल्या मोहिते पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी खेड तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, उद्योगपती आणि सर्वसामान्य नागरिकांनी राजगुरूनगर येथील ‘रत्नाई’ निवासस्थानी दिवसभर हजेरी लावली.

 

सकाळपासून संध्याकाळपर्यंत ग्रामपंचायतींचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, सहकारी संस्थांचे संचालक, शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांनी पुष्पगुच्छ देत मोहिते पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने तालुक्यातील त्यांचा जनाधार आणि राजकीय दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा होती.

 

अजितदादांच्या निधनामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे दिलीप मोहिते पाटील यांनी वाढदिवस कोणत्याही उत्सवाशिवाय साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार कोणताही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला नाही.

मोहिते पाटील यांनी प्रथम स्व. अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या भेटी स्वीकारल्या.

 

राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, आजी-माजी आमदार, पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच विविध पक्षांच्या नेत्यांनी दूरध्वनीद्वारे मोहिते पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी अनेकांनी त्यांचा उल्लेख “खेड तालुक्याचे शिल्पकार”, “विकासाचे महामेरू”, “कार्यसम्राट”, “जनतेचे श्रद्धास्थान” आणि “संघर्षशील नेता” अशा बिरुदावलींनी केला.

 

‘२०२९ मध्ये पुन्हा आमदार होतील’ – शुभेच्छुकांचा विश्वास

शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांनी रत्नाई निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांनी दिलीप मोहिते पाटील हे तालुक्याच्या हितासाठी सातत्याने लढणारे नेतृत्व असून २०२९ मध्ये ते पुन्हा आमदार होतील, असा विश्वास व्यक्त केला.

 

 

अनेक मान्यवरांची उपस्थिती..

जिल्हा परिषदेचे माजी सभापती व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, संचालिका लता गोपाळे, जिल्हा परिषद सदस्य सुनिता बुट्टे पाटील, समीर सुपे, लोकनेते अशोक खांडेभराड, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शांताराम भोसले, पंचायत समितीच्या सदस्य अश्विनी तरस,महेंद्र मेदनकर, राक्षेवाडीचे माजी उपसरपंच व राजगुरुनगर शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष होले, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर शंकर कावडे, श्रद्धा मांडेकर,

शिवम उद्योग समूहाचे उद्योजक सोमनाथशेठ तरस, चाकणचे उद्योजक भरतशेठ कानपिळे, राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, बँकेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक किरण आहेर, संचालिका अश्विनी पाचारने, माजी सभापती शांताराम चव्हाण, सुरेश शिंदे, शांताराम इंगवले, अंकुश राक्षे, सतीश राक्षे, नवनाथ होले, माजी जिल्हा परीषद सदस्या मंगल चांभारे, शामराव वाळुंज, लक्ष्मण मुके, बाळासाहेब गोपाळे, भीमाशंकर देवस्थान अध्यक्ष सुरेश कौदरे, माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, महेंद्र काळे, राष्ट्रवादीच्या नेत्या कांचन ढमाले, तालुकाध्यक्ष संध्या जाधव, माजी सरपंच मंगल जाधव, तिन्हेवाडी सरपंच प्रतीक्षा पाचारने, डॉ.दिलीप बांबळे, रोहन अनिलबाबा राक्षे, अनिल डांगले, राजेंद्र पाचारने, डॉ.प्रमिला बांबळे, माजी उपसरपंच अभिजित होले,

माजी सरपंच मचिंद्र राक्षे, मनीषा टाकळकर, विलास मांजरे, मयूर मोहिते, माजी सरपंच अनिता मांजरे, राजगुरूनगर नगरपरिषदेचे नगरसेवक दिनेश सांडभोर, सागर सातकर, स्नेहल राक्षे, निलेश घुमटकर, सुनील देवकर, रेवननाथ थिगळे, युवानेते विकास चव्हाण, सरपंच भरत तरस, महादेव ठाकूर, वैभव नाईकरे, नितीन गुरव, प्रा.बापूसाहेब चौधरी, माजी सभापती विलास कातोरे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर उमेश मोरे,

तहसीलदार प्रशांत बेडशे, नायब तहसीलदार राम बीजे, चेतन मोरे, निवृत्त पोलीस अधिकारी सोपानराव राक्षे, खेड, चाकण, महाळुंगे, आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी,बाजार समितीचे अनेक संचालक, खरेदी विक्री संघाचे अनेक संचालक, उपविभागीय कृषी अधिकारी,तालुका कृषी अधिकारी, तालुक्याचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे, शिक्षणाधिकारी अमोल जंगले, पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंता कालिंका खरात, प्रसार माध्यमांचे अनेक प्रतिनिधी, खेड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

“तालुक्याच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व” 

​​​​“दिलीप मोहिते पाटील हे तालुक्याच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व आहे. त्यांच्या कार्यकाळात रखडलेल्या विकासकामांना गती मिळाली. खेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले असून जनतेत त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे.” शरद बुट्टे पाटील, सदस्य, जिल्हा नियोजन समिती

 

“खेडच्या अस्मितेसाठी लढणारा नेता”

“तालुक्यातील सर्वसामान्य जनता आजही त्यांना ‘आमदार आण्णा’ म्हणून ओळखते. पद असो किंवा नसो, खेड तालुक्याच्या विकासासाठी काम करणे हेच त्यांचे ध्येय आहे. ते खेडच्या अस्मितेसाठी लढणारे नेतृत्व आहे.” – अशोक खांडेभराड, राष्ट्रवादी काँग्रेस नेते