Khed | अविनाश धनवे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
५० रक्तदात्यांनी केले रक्तदान |
Blood Donation camp
महावार्ता लाईव्ह | आळंदी (ता.खेड ) येथील अविनाश धनवे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित शिबिरामध्ये ५० जणांनी रक्तदान केले. एस टी स्टँड वायझॅक्शन आळंदी येथे शिबीर पार पडले. रक्तदान शिबिरामध्ये आळंदी परीसरातील नागरिकांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला.या शिबिराचे आयोजन अविनाश धनवे मित्र परिवार व पूजा अविनाश धनवे, विक्रम सोळंकी, राकेश सोळंकी यांच्याकडून करण्यात आले.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी चक्रेश्वर मेडिकल फाउंडेशन चाकण पुणे संस्था यांच्याकडून सहकार्य करण्यात आले. तसेच सहभागी रक्तदात्यानां प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी RPI जिल्हाध्यक्ष रोहित सोनवणे, उद्योजक किरण पवार, आदिक कदम, विपुल पिंगळे, किरण खंडागळे तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांनी भेटी दिल्या.
रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान असून रक्ताची निर्मिती जगातील कोणत्याही कारखान्यात होत नसल्याने नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेण्याचे आवाहन केले पूजा अविनाश धनवे यांनी केले.
