शिवे-वाकी सोसायटी अध्यक्षपदी शिवाजी शिवेकर उपाध्यक्षपदी रमेश सोनवणे यांची निवड

शिवाजी शिवेकर यांना शिवे सोसायटी मधील सर्वात तरुण अध्यक्ष तर रमेश सोनवणे अनु.जातीचे पहिले उपाध्यक्ष होण्याचा मान मिळाला.

शिवे-वाकी सोसायटी अध्यक्षपदी शिवाजी शिवेकर उपाध्यक्षपदी रमेश सोनवणे यांची निवड

राजगुरुनगर 

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे असलेली शिवे विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शिवाजी शिवेकर तर उपाध्यक्षपदी रमेश सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली.निवडीनंतर अध्यक्ष,उपाध्यक्ष यांचा फेटा बांधून व शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
 

ठरल्याप्रमाणे मुदतीत मावळते अध्यक्ष दत्तू शिवेकर व उपाध्यक्ष शंकर सातपुते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त असलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुक खेड बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक पार पडली.निवडणुकीचे कामकाज निवडणुक अधिकारी जे.बी.मुलाणी व सचिव बाळासाहेब शिवेकर यांनी पाहिले. यावेळी सोसायटी संचालक शंकर सातपुते, शोभा शिवेकर, संपत शिवेकर, रमेश सोनवणे, शिवाजी शिवेकर, किसन गडदे हे ६ सदस्य उपस्थित होते तर ५ संचालक गैरहजर राहिले, २ संचालक रिक्त जागा आहेत.

यावेळी माजी सरपंच शांताराम शिवेकर, सरपंच अक्षय शिवेकर,उपसरपंच कविता शिवेकर,माजी सरपंच ज्ञानेश्वर शिवेकर, माजी चेअरमन नामदेव शिवेकर, अध्यक्ष नवनाथ शिवेकर, पोलीस पाटील ज्ञानेश्वर साळुंके,माजी चेअरमन दत्तू शिवेकर, ग्रामपंचायत सदस्य आनंद साकोरे, लहू सातपुते, पोपट साळुंके, विश्वनाथ शिवेकर, तज्ञ संचालक जिजाभाऊ शिवेकर, पै. जयराम खेंगले, संतोष शिवेकर, महादू घोंगे, लक्ष्मण शिवेकर, शिवछत्रपती मंडळाचे अध्यक्ष मयुर मोरे, मा. अध्यक्ष स्वप्नील सातपुते, सखाराम शेळके, तुकाराम साकोरे, काळुराम साळुंके, अनिल शिवेकर, दशरथ शिवेकर, रोहिदास दिवटे, किसन शिवेकर, अमोल शिवेकर, प्रशांत शिवेकर, शरद नवले, विशाल नवले, राहुल नवले, ऋषी शिवेकर, संतोष सोनवणे, अजित शिवेकर, नवनाथ गडदे, सचिन वाघमारे, कैलास सोनवणे उपस्थित होते.

 

माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख व कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे,माजी पंचायत समिती सभापती चांगदेव शिवेकर यांनी निर्वाचित पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.