₹5 Lakh for Koliye Akhada | ग्रामीण मल्लांना मिळणार हक्काचे व्यासपीठ! कोळीये कुस्ती आखाड्यासाठी ५ लाखांचा निधी मंजूर
खेड तालुक्यातील कोळीये गावात नवीन कुस्ती आखाड्यासाठी जिल्हा परिषद सदस्या प्रा. सुनीता शरद बुट्टे पाटील यांच्या प्रयत्नातून ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील कोळीये गावात नवीन कुस्ती आखाड्यासाठी ५ लाख रुपये निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या भागाच्या जिल्हा परिषद सदस्या सुनीता शरद बुट्टे पाटील मंजूर केला आहे. कुस्ती आखाड्याच्या उपयोग कुस्ती क्षेत्रात करिअर करणाऱ्या युवा तरुणांना फायदा होणार आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात गावागावात अनेक कुस्ती खेळणारे मल्ल तयार होत आहेत. कुस्तीसाठी चांगले वातावरण निर्माण व्हावे यासाठी या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी कोळीये गावच्या यात्रेनिमित्त भरविलेल्या कुस्ती आखाड्यात उपस्थित राहून ग्रामस्थांना कुस्ती आखाडा बांधकामासाठी निधी देण्याचा शब्द दिला होता.
पण त्यानंतरच्या काळात जिल्हा परिषद निवडणुकित हा गट महिलांसाठी राखीव झाल्याने या गटातून शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी आणि भामाई महिला सक्षमीकरण अभियानाच्या प्रमुख प्रा.सुनीता बुट्टे पाटील निवडून आल्या. शरद बुट्टे पाटील यांनी कोळीये आखाड्यासाठी दिलेला शब्द या भागाच्या अभ्यासू जिल्हा परिषद सदस्या प्रा. सुनीता बुट्टे पाटील यांनी ५ लाखाचा निधी देऊन पूर्ण केला.
कोळीये गावच्या आखाड्यासाठी ५ लाखाचा निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी बुट्टे पाटील यांचे अभिनंदन केले. मंजूर निधीतून आखाड्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आखाड्याचा उपयोग कुस्ती क्षेत्रातील तरुणांना कुस्ती खेळण्यासाठी किंवा सराव करण्यासाठी होणार आहे. दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल कोळीये ग्रामस्थांनी शरद बुट्टे पाटील यांचे आभार मानले आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात कुस्ती क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक तरुण मेहनत करीत आहेत. त्यांच्या मेहनती प्रयत्नांना यश मिळावे यासाठी त्यांना कुस्ती आखाड्यासारख्या आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. गावातील युवा तरुणांना गावात होणाऱ्या कुस्ती आखाड्याचा चांगला उपयोग होईल. ग्रामीण भागातील कुस्तीगीर मल्ल अधिक जोमाने या आखाड्यात सराव केल्याने त्यांना फायदा होईल.कुस्तीगीर यांचेसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू. - सुनीता बुट्टे पाटील - सदस्या पुणे जिल्हा परिषद