Sharad buttepatil Birthday | अजितदादांच्या निधनामुळे शरद बुट्टे पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने; शुभेच्छांऐवजी मुलींच्या शिक्षणासाठी मदतीचे आवाहन
पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि सत्कार न स्वीकारण्याचा निर्णय; कमलाई प्रतिष्ठानमार्फत गोरगरीब शाळकरी मुलींना शैक्षणिक मदतीसाठी देणगीचे आवाहन
Ajit dada pawar | sharad butte patil
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे नेते, जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या सार्वजनिक जीवनातील मार्गदर्शक आणि अनेक महत्त्वाच्या प्रसंगी खंबीर साथ देणारे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
२७ मे २०२६ रोजी होणारा आपला वाढदिवस आपण व आपल्या कुटुंबीयांकडून कोणत्याही प्रकारचा उत्सव, सत्कार किंवा कार्यक्रम न करता साधेपणाने पाळला जाणार असल्याचे बुट्टे पाटील यांनी सोशल मीडिया मध्ये पोस्ट करत जाहीर केले. तसेच वाढदिवसानिमित्त कुणीही पुष्पगुच्छ, भेटवस्तू किंवा सन्मानासाठी येऊ नये, अशी विनंती त्यांनी कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिकांना केली आहे.
याउलट, वाढदिवसाच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ११ मान्यवरांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. सार्वजनिक जीवनात सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी गोरगरीब कुटुंबातील शाळकरी मुलींच्या शिक्षणासाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. यासाठी कमलाई प्रतिष्ठान या नोंदणीकृत संस्थेमार्फत शालेय साहित्य व शैक्षणिक सहाय्य पुरविण्यात येणार असून नागरिकांनी स्वेच्छेने देणगी द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
शिक्षणापासून वंचित राहू नयेत आणि आर्थिक अडचणींमुळे मुलींचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन शरद बुट्टे पाटील यांनी केले आहे.
देणगीसाठी बँक तपशील :
Account Name : Kamlai Pratishthan
Account No. : 925010053088120
IFSC Code : UTIB0005197
Bank Name : Axis Bank, warale
सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाचे स्वरूप सेवाभावी उपक्रमात बदलण्याचा शरद बुट्टे पाटील यांचा निर्णय तालुक्यात चर्चेचा विषय ठरत असून अनेकांनी त्याचे स्वागत केले आहे.
