गडद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या 'द वेलकम' या नाटकाचा बीटस्तरावर प्रथम क्रमांक

गडद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या 'द वेलकम' या नाटकाचा बीटस्तरावर प्रथम क्रमांक

राजगुरूनगर : न्यूज नेटवर्क

खेड तालुक्याच्या दुर्गम डोंगरी पश्चिम भागातील गडद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या 'द वेलकम' या नाटकाचा बीटस्तरावर प्रथम क्रमांक आला.तालुका स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी या नाटकाची निवड झाली.

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दहा कलमी कार्यक्रमातील इंग्रजी अध्ययन समृद्धी कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने पाईट बीट स्तरातील इंग्रजी अध्ययन समृद्धी कार्यक्रम व विविध स्पर्धा  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोये पार पडल्या.स्पर्धेत ५ वी,६ वी गटातील इंग्रजी नाटक याचाही तृतीय क्रमांक आला.तसेच इंग्रजी कविता गायन स्पर्धेत शाळेचा द्वितीय क्रमांक आणि इंग्रजी निबंध लेखन स्पर्धेमध्ये शृती शिर्के या विद्यार्थिनीचा द्वितीय क्रमांक आला आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे पाईट बीटच्या विस्ताराधिकारी सुनंदा शेवकरी,शिवे केंद्रप्रमुख भारती उबाळे,शाळेचे मुख्याध्यापक ताराचंद तळपे, प्रमोद पारधी, नारायण करपे, तानाजी म्हाळुंगकर व तसेंच सरपंच,उपसरपंच,सदस्य व ग्रामस्थानी मुलांचे अभिनंदन केले.

-----------------------------------------------------