कोयेच्या आझाद हिंद स्पोर्ट क्लबने मिळवला प्रथम क्रमांक

कोरेगाव बुद्रुक गावचे उपसरपंच व उद्योजक रोहित डावरे पाटील मित्र परिवाराने आयोजित केलेल्या K3PL क्रिकेट स्पर्धा पाच दिवस सुरू होत्या.

कोयेच्या आझाद हिंद स्पोर्ट क्लबने मिळवला प्रथम क्रमांक

राजगुरूनगर - प्रतिनिधी

किवळे (ता.खेड) येथे क्रिकेटसाठी उभारलेल्या भव्य मैदानावर पाच दिवस रंगलेल्या क्रिकेट स्पर्धेत कोयेच्या आझाद हिंद स्पोर्ट्स क्लबने प्रथम क्रमांक मिळवीत ३१ हजार रुपयेचे बक्षीस पटकावले.
कोरेगाव बुद्रुक गावचे उपसरपंच व उद्योजक रोहित डावरे पाटील मित्र परिवाराने आयोजित केलेल्या K3PL क्रिकेट स्पर्धा पाच दिवस सुरू होत्या.या स्पर्धेत निमंत्रीत आठ संघांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेतील विजेत्या संघांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. प्रथम क्रमांक आझाद हिंद स्पोर्ट क्लब (कोये),द्वितीय क्रमांक नितीनशेठ भोकसे स्पोर्ट क्लब (कुरकुंडी),तृतीय क्रमांक हिंदवीर पलटण (किवळे),चतुर्थ क्रमांक मुकाई टायगर्स (कुरकुंडी) हे चार संघ विजयी ठरले आहेत.स्पर्धेचे बक्षीस वितरण पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांचे हस्ते झाले.यावेळी रोहित डावरे पाटील,सरपंच गणेश चौधरी आदीसह विविध गावचे सरपंच,उपसरपंच,सदस्य,संघाचे मालक,क्रिकेटपटू व क्रिकेट शौकीन उपस्थित होते.

क्रिकेट आता सर्वांचा आवडीचा खेळ असल्याने तरुणांसाठी येथे आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धा भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. ग्रामीण भागातून क्रिकेटपटू निर्माण व्हावेत,असे मत बुट्टे पाटील यांनी बक्षीस वाटप प्रसंगी व्यक्त केले.

स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी माजी उपसभापती अमोल पवार,भाजपचे तालुकाध्यक्ष व बाजार समिती संचालक शांताराम भोसले,माजी उपसभापती माणिक कदम, किवळेचे सरपंच गणेश चौधरी, कोयेचे सरपंच रामदास राळे,उपसरपंच रोहित डावरे,माजी सरपंच संतोष कड आदीसह संघमालक व क्रिकेटपटू उपस्थित होते.
------------------------------------------------