खेड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांची नियुक्ती
राजगुरूनगर : खेड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून नव्याने नियुक्ती झालेले पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी पदभार स्वीकारला आहे.
यापूर्वीचे सतीश गुरव यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी तात्पुरता खेड पोलीस स्टेशनचा पदभार विजयसिंह चौहान यांच्याकडे होता.नव्याने आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारताच तडकाफडकी अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.चौहान यांना जिल्हा शाखेतील ११२ डायल विभागात पाठवून खेड पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी म्हणून राजकुमार केंद्रे यांची नियुक्ती केली. केंद्रे यांनी चाकण पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम केलेले असून चांगले दबंग अधिकारी म्हणून त्यांचा दबदबा आहे.
खेड पोलीस स्टेशनचे मोठे कार्यक्षेत्र असून हद्दीत जवळपास ९० च्या आसपास गावांची संख्या आहे.येथे काम करणे तसे सोपे नसून हद्दीतील मटका,जुगार, धाब्यावर अनधिकृत दारूविक्री,गांजा विकणे आदी बेकायदेशीर धंदे बंद करण्यासह फोफावलेल्या गुन्हेगारी टोळीचा बंदोबस्त करणे हे मोठे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे.
