वासुली गावात पोलवरील लाईट दिवसाढवळ्या सुरू ? नेमलेल्या वीज वितरण कंपनीच्या वायरमनचे दुर्लक्ष.

वासुली गावात पोलवरील लाईट दिवसाढवळ्या सुरू ? नेमलेल्या वीज वितरण कंपनीच्या वायरमनचे दुर्लक्ष.

राजगुरूनगर : प्रतिनिधी
वासुली (ता.खेड) येथील गावच्या परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रीटलाईट पोलवरील लाईटचे दिवे दिवसाढवळ्या देखील सुरू आहेत.या गंभीर प्रकारामुळे वीज वितरण कंपनीची वीज विनाकारण वाया जात आहे.आतापर्यंत हजारो युनिट वीज वाया गेल्याने वीज कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.वासुलीत अनेक महिन्यांपासून पोलवरील लाईटचे दिवे दिवसा सुरू आहेत, त्यामुळे या भागात नेमलेल्या वायरमनचे कामाकडे लक्ष नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
          एमआयडीसी टप्पा क्रमांक दोनच्या वासुली,वराळे सावरदरी,शिंदेगाव भांबोली या पाच गावांना वीज वितरण कंपनीने एकच वायरमन नेमलेला आहे.कागदोपत्री नाही परंतु कारखानदारी यामुळे पाच गावे मिळून लाखभर लोकसंख्या असलेल्या पाच गावांना एकच वायरमेन अशी भयानक परिस्थिती आहे.वासुली गावच्या परीसरातील रस्त्याच्या कडेला,गावठाण यासह वाड्यावस्त्यांवर ट्रीट लाईट आहे.दररोज ट्रीट लाईट चालू बंद न करता विद्युत पोलवरून थेट पथ दिव्यांना कनेक्शन दिल्याने पोलवरील लाईटचे दिवे दिवसाढवळ्या सुरू आहेत.दिवसरात्र २४ तास पथदिवे सुरू असल्याने आतापर्यंत किती युनिट वीज वाया गेली असेल याचा हिशोब कोण करणार व नुकसान भरपाई वायरमन कडून करणार का,असा प्रश्न वासुली गावचे ग्रामस्थानी उपस्थित केला आहे.
       वासुली परिसरात सध्या अनेक मोठमोठे बांधकामे सुरू आहेत.अनेकांनी आकडे टाकून वीज वापरीत आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात विजेची चोरी होत आहे.वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने अचानक येऊन पाहणी केली तर शेकडो लोकांनी आकडा टाकून वीज वापरत असल्याचा प्रकार निदर्शनास येईल.विजेचा तुटवडा असल्याचे वीज कंपनी सांगत असताना अशा प्रकारे जर दिवसाढवळ्या लाईटचे दिवे सुरू असतील तर कंपनीची प्रगती होणार का ? गावाला स्वतंत्र वायरमन नेमावा अशी पाचही गावच्या ग्रामस्थांची मागणी जोर धरू लागली असून वायरमन बाबत अनेक तक्रारी आहेत.आकडे टाकून चोरून वीज वापरण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा प्रकार कधी थांबणार ? पाच गावे सांभाळताना एका वायरमनची दमछाक होते व कामाचा ताण येतो.मग वीज कंपनी प्रत्येक गावाला वायरमनची नेमणूक कधी करणार ? असे अनेक प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.