Khed zp election | जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार श्रीनाथ लांडे यांना जनशक्तीचं बळ...!
श्रीनाथ लांडे यांना गावागावातून स्वयंस्फूर्तीने ५ लाखांहून अधिक वर्गणी..!
महावार्ता लाईव्ह | जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील पिंपळगाव तर्फे मरकळ गटात शिवसेना शिंदेगटाचे उमेदवार जनसेवक श्रीनाथ लांडे पाटील यांना मतदारांनी दिलेला अनोखा आणि भावनिक पाठिंबा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. गावागावातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने वर्गणी जमा करून उमेदवाराला थेट आर्थिक आणि भावनिक बळ दिले आहे. ही रक्कम ५ लाख रुपयांहून अधिक असून, ही केवळ आर्थिक मदत नसून जनतेचा विश्वास आणि जनशक्तीचे प्रतीक आहे.
श्रीनाथ लांडे हे खेड तालुक्यात आरोग्यदूत आणि जनसेवक म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून ते जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी २४ तास ३६५ दिवस सक्रिय आहेत. त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे गावकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गावकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि धनशक्तीपेक्षा जनशक्ती मोठी असते हे सिद्ध करून दाखवले.
जनतेने दाखवला थेट पाठिंबा
▪️गावागावातून स्वयंस्फूर्तीने वर्गणी जमा झाली.
▪️शेतकरी, कामगार, छोटे व्यावसायिक यांनी आपल्या क्षमतेनुसार योगदान दिले.
▪️ही वर्गणी उमेदवाराच्या प्रचारासाठी आणि जनसेवेसाठी वापरली जाणार आहे.
▪️उमेदवार श्रीनाथ लांडे यांनी सांगितले, "ही केवळ पैशाची मदत नाही, तर जनतेचा विश्वास आहे. जनशक्तीचा हा बळ मला अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देतो. धनशक्तीपेक्षा जनशक्ती मोठी ठरते, हे यातून सिद्ध झाले आहे."
निवडणुकीत तिरंगी लढत, पण जनसेवकाची सरशी
पिंपळगाव-मरकळ गटात श्रीनाथ लांडे यांना शिवसेना (धनुष्यबाण) ची उमेदवारी मिळाली आहे. गटात उबाठा गट (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट असा तिरंगी सामना रंगनार आहे. गटात तिरंगी लढत असूनही जनसेवक लांडे यांची सरशी दिसत आहे. त्यांच्या प्रचारात भव्य कार्यक्रम,जनता दरबार आणि सेवाभावी कामांचे प्रदर्शन सुरू आहे.
जनसेवक श्रीनाथ लांडे यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, "साथ देणारी माणसे पैशाने विकत घेता येत नाही, ती कमवावी लागतात. दादांच्या सेवेमुळे जनतेने स्वतःहून मदत केली."
हा उपक्रम जनशक्तीचे बळ आणि सेवाभावी राजकारण याचे उत्तम उदाहरण ठरला आहे. निवडणुकीत विजय मिळवून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी श्रीनाथ लांडे पूर्णपणे सज्ज दिसत आहेत. जनतेच्या या भावनिक पाठिंब्याने गटातील राजकीय वातावरण बदलले आहे.
