Crime | मावळ तालुक्यात धक्कादायक घटना : ५ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या

शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाच वर्षीय चिमुकली घरातून बेपत्ता झाली होती

Crime | मावळ तालुक्यात धक्कादायक घटना : ५ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या

 

महावार्ता लाईव्ह | मावळमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून, या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही पाच वर्षीय चिमुकली घरातून बेपत्ता झाली होती. रात्री उशिरा आई कामावरून घरी परतल्यानंतर मुलगी बेपत्ता असल्याचे उघड झाले. माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री आई कामावरुन घरी आल्यानंतर मुलगी बेपत्ता असल्याचे तीच्या लक्षात आले. माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. प्राथमिक तपासात उघड झाले की, घरात अनेकदा एकटी राहणाऱ्या चिमुकलीचा फायदा घेत समीर कुमार मंडळ (वय 30 ते 35 विवाहित) या आरोपीने तिला घराजवळच काही अंतरावर नेले. तिथे तिच्यावर बलात्कार करून गळा दाबून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. आज सकाळी चौकशीत संपूर्ण घटना उघडकीस आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या अमानुष कृत्यामुळे मावळ परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.