पाईट विकास सोसायटी कडून ३५२ सभासद शेतकऱ्यांना ९० लाख रुपयेचे कर्ज वाटप
राजगुरूनगर - प्रतिनिधी
खेड तालुक्यातील पाईट विकास सोसायटी कडून ३५२ सभासद शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी जवळपास ९० लाख रुपये कर्जाचे वाटप केल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष रामदास सावंत व सचिव सुनील रौधळ यांनी दिली.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व बँकेचे विभागीय अधिकारी विलास भास्कर यांचे सहकार्य लाभल्याने पीडिसीसी बँक शाखा पाईट कडून पाईट विकास सोसायटीला रब्बी हंगाम सन २०२१-२२ ज्वारी पिकासाठी ३५२ सभासद शेतकऱ्यांना ९० लाख १६ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.रब्बी हंगाम पूर्वीच कर्ज मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
कर्ज वाटप प्रसंगी पाईट शाखेचे बँक व्यवस्थापक दत्तात्रय सावंत,विकास अधिकारी प्रशांत रौंधळ,सोसायटी अध्यक्ष रामदास सावंत,संचकाक पंडित रौंधळ,शंकर रौंधळ,नवनाथ दरेकर,नारायण आहेरकर ,दत्तात्रय रौंधळ, बबन खेंगले,ठकाजी रौंधळ,आश्विनी रौंधळ,शिवकाली खेंगले,सुनील रौधळ,गोपीचंद गायकवाड,शंकर ठाकूर, मल्हारी शिवेकर,महादू डांगले,आनंदराव डांगले,सुनिल डांगले, दिपक डांगले,सुनिल कलवडे,अनिल डांगले व सभासद शेतकरी उपस्थित होते.
